Breaking News

जीएसटी संकलनाने गाठला तळ.


नवी दिल्ली : वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी १ जुलै २०१७ पासून देशभरात अमलात आला. तेव्हापासून हळूहळू जीएसटी संकलनात वाढ होण्याची अपेक्षा होती; पण ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनाने आतापर्यंतची सर्वात निम्न पातळी गाठली आहे. 

या महिन्यात देशभरातून एकूण ८३३४६ कोटी रुपये जीएसटी कर गोळा झाला आहे. अधिकाधिक व्यापाऱ्यांकडून इनपूट टॅक्स क्रेडिट परताव्याची मागणी करण्यात आल्यामुळे जीएसटी संकलनात लक्षणीय घट झाली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे म्हणणे आहे. 

जीएसटी दरांचा आढावा घेतल्यानंतर अनेक वस्तूंवरील करांच्या दरात घट करण्यात आली असून, त्याचा परिणामदेखील ऑक्टोबरमधील कर संकलनावर झाला आहे. बहुतांश जिनसांवरील कर कमी करण्यात आल्यामुळे सरकारच्या उत्पन्नात घट होणे अपेक्षित होते, असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.