’मी कोणाच्या दबावाखाली काम करत नाही - महापौर नितीन काळजे
पुणे, दि. 21, जुलै - पिंपरी-चिंचवड महापालिकेत आम्हाला सभागृहात बोलू द्या, दबावाखाली काम करु नका’ असे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी म्हणताच महापौर नितीन काळजे यांनी ’मी कोणाच्या दबावाखाली काम करत नाही. तुम्ही मला शिकवू नका असे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा (गुरुवारी) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. सभेला सुरुवात होताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी रिंग रोडबाबत तसेच आरोग्य, रस्त्यावरील खड्डे अशा शहरातील विविध गंभीर प्रश्नांबाबत चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर महापौर नितीन काळजे यांनी सभा संपल्यानंतर त्यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सभेला सुरुवात झाली. दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस रकमेत वाढ करण्याचा विषय मंजूर झाला. पत्रकारांना पीएमपीएल बसचे मोफत पास देण्याचा विषय उपसूचनेसह मंजूर झाला.
विषय मंजुरीनंतर सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, पत्रकारांना आम्ही सर्व सुविधा देणार आहोत. मोफत पास देण्याची पत्रकारांनी मागणी केली होती. तसेच पत्रकारांना घरे देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यावर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, पत्रकारांना भाजप नाही तर पालिका देते. आजपर्यंत पत्रकारांना मोफत पास दिले जात होते. परंतु, भाजपच्या कार्यकाळात पत्रकारांना पास देण्यासाठी तीन महिने उशीर झाला आहे.त्यानंतर ग्रामपंचायतमधील कर्मचा-यांना पालिकेत वर्ग करण्याचा विषय उपसूचनेसह मंजूर झाला. त्यानंतर वादावादीला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, सर्वच विषय उपसूचनेसह मंजूर केले जात आहेत. सभागृह नेते एकनाथ पवार तर म्हणतात राष्ट्रवादीने उपसूचनांद्वारे बक्कळ पैसे कमविले आहेत. भाजपला खोटे काम करायचे आहे. प्रत्येक विषयाला उपसूचन दिली जाते. त्याला सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. महापौर काळजे यांनी बहल यांना विषयाला धरुन बोलायाला सांगत सत्ता आमची आहे. उपसूचना आम्ही घेऊन मंजूर करुन घेऊ शकतो, असे सांगितले.