कन्या विद्या मंदीरची ज्ञानेश्वरी रंधे तालुक्यात प्रथम
अकोले / प्रतिनिधी ।
मार्च 2018 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कन्या विद्या मंदीर अकोलेची विद्यार्थीनी ज्ञानेश्वरी विठ्ठल रंधे हिने 97 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला, अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा पोखरकर यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, कन्या विद्यालयाचा एकूण निकाल 97.56 टक्के लागला आहे. विद्यालयामध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणार्या आठ विद्यार्थीनी असून त्यामध्ये ईश्वरी चोथवे (93.20 टक्के), गौरी मंडलिक (92.80 टक्के), पुनम महाडदेव (91.60 टक्के), अदिती भोर (91.60 टक्के), मुस्कान पटेल (91.20 टक्के), ऐर्श्वया देशमुख (90 टक्के), दिपाली वाकचौरे (90 टक्के) यांनी असे यश संपादन केले आहे.
तसेच तालुका एज्युकेशन सोसायटीच्या असलेल्या इतर आठ विद्यालयांचा निकाल हा 90 टक्क्यांपेक्षा अधिक लागला असून, त्यामध्ये कन्या विद्या मंदिर अकोले (97.56 टक्के), संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी (97.22 टक्के), आम्लेश्वर विद्यालय आंभोळ (93.02 टक्के), छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेंहेदूरी (92.50 टक्के), भैरवनाथ विद्यालय चास (92.30 टक्के), सरस्वती माध्यमिक विद्यालय धामणगाव पाट (90.90 टक्के), ह.भ.प. सावित्राआई विद्यालय विठे (90.62 टक्के), भारतरत्न राजीव गांधी विद्यालय धामणगाव आवारी (86.66 टक्के), शेषनारायण विद्यालय कुंभेफळ (86.27 टक्के), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी (83.70 टक्के) इतका लागला आहे.
यशस्वी परिक्षेतील या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकर पिचड, कायम विश्वस्त अॅड. प्रेमानंद रुपवते, आ. वैभव पिचड, सीताराम गायकर, विश्वस्त डॉ.बी.जी. बंगाळ, दशरथ सावंत, मीनानाथ पांडे, संस्थेचे अध्यक्ष जे.डी आंबरे, उपाध्यक्ष मधुकर सोनवणे, सेक्रेटरी यशवंत आभाळे, सहसेक्रेटरी अॅड. भाऊसाहेब गोडसे, खजिनदार एस.पी. देशमुख, कार्यकारिणी सदस्य अशोक भांगरे, अॅड. आनंद नवले, सुधाकर देशमुख, कल्पना सुरपुरिया, धनंजय संत, बाळासाहेब भोर, रमेश देशमुख, आरिफ तांबोळी, राहूल बेणके, सुलोचना वैद्य, शिक्षणाधिकारी संपत मालुंजकर, अकोले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, आयटीआयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, पॉलिक्टेनिक कॉलेजचे प्राचार्य ए.पी. शिंदे, एमबीएचे डायरेक्टर डॉ. प्रशांत तांबे, परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कुलच्या प्रा. मीना नवले यांनी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.