Breaking News

संस्थेत काम करणारांच्या कर्तृत्वामुळेच संस्थेला मोठेपण प्राप्त होते - अभंग

भेंडा (प्रतिनिधी ) :-- प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठतेने संस्थेत काम करणारांच्या कर्तृत्वामुळेच संस्थेला मोठेपणा प्राप्त होत असतो असे प्रतिपादन ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले .

भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांना पुणे येथील भारतीय शुगर संस्थेचा सहकारी साखर कारखानदारीतील राज्यस्तरीय उत्कृष्ठ कार्यकारी संचालक पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचा ज्ञानेश्वर उद्योग समूह व कामगार संघटनेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात माजी आमदार पांडुरंग अभंग बोलत होते. अभंग पुढे म्हणाले, कोणतीही संस्था सहजासहजी उभी राहत नाही आणि सहजासहजी मोठी ही होत नाही. ती मोठी होते ती व्यवस्थापन आणि संस्थेत काम करणाऱ्या प्रामाणिक माणसांमुळे. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी संस्था उभ्या केल्या, चालविल्या आणि नावारुपास आणल्या. त्यांचाच आदर्श आणि विचार घेऊन नरेंद्र घुले पाटील, चंद्रशेखर घुले पाटील संस्था चालवीत आहेत. संस्थेत आपल्या सहकाऱ्यांकडून काम करून घेणं, त्यांना तयार करणं हे मोठ कठीण काम असत. केवळ पदवी घेऊन सर्व ज्ञान प्राप्त होते असे कधीच होत नाही. कारखान्याचे सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी चिफ केमिस्ट एम.एस.मुरकुटे, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, मुख्य अभियंता राहुल पाटील, आसवणी प्रमुख महेंद्र पवार, प्रसाशकीय अधिकारी के.एन.गायके, अधीक्षक एन.बी.पुंड ,कामगार संचालक सुखदेव फुलारी, बापुसाहेब सुपारे, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, मच्छीन्द्र वेताळ, मुख्य लेखापाल रामनाथ गरड, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, सुरक्षा अधिकारी ई. आर.कदम, अण्णासाहेब गर्जे, औताडे, पत्रकार माने, राहुल कोळसे उपस्थित होते. सांस्कृतिक मंडळाचे सचिव कृष्णा उगले यांनी आभार मानले.