Breaking News

इरफान सय्यद यांची पो. उपनिरीक्षकपदी निवड

जामखेड / श.प्रतिनिधी । 23 ः
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, यामध्ये जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकर्‍याचा कुटूंबातील इरफान मन्सूर सय्यद याने यशस्वी होवून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. या यशाबद्दल नगरसेवक शामीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली लब्येक यंग गृप व कॉलेजमधील तरूणांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहरातील नूरानी कॉलनी येथे झालेल्या सत्कारप्रसंगी नगरसेवक शामीर सय्यद, अझहर खान, तौफिक शेख, नाजीम शेख, आसिफ सय्यद, रसूल तांबोळी, मूजाहिद पठाण, चांद तांबोळी, समदभाई टेलर, हसन शेख, सालार सय्यद, सादिक शेख, रफीक बेग, याकूब तांबोळी, निहाल शेख, पप्पू शेख, अकील शेख आदींनी कौतुक केले.