Breaking News

ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेस आत्मविश्‍वासाने सामोरे जावे

वरुर / प्रतिनिधी । 23 ः
अभिनव युवा प्रतिष्ठानच्या वतीने वरुर या ठिकाणी नुकत्याच राज्य सेवा आयोगातून पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्त झालेले अतुल मुरदारे, सुनिल वारंगुळे, रामा ठाणगे यांचा सत्कार मानपत्र देऊन करण्यात आला.
ग्रामीण भागातील तरुणांकडे जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत करण्याची इच्छा असेल तर, नक्कीच अधिकारी तयार होतील, अशी प्रतिक्रिया या तीनही अधिकार्‍यांनी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी उमेश भालसिंग, माजी सरपंच विष्णू म्हस्के, संजय वावरे, माणिक म्हस्के, बादशहा शेख, साहेबराव रेवडकर, शेखर मुरदारे, आत्माराम म्हस्के, अजय खडके, अनिल खडके, सुधीर म्हस्के, श्रीधर म्हस्के, शेषराव म्हस्के, अविनाश म्हस्के, प्रविण म्हस्के उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सचिन म्हस्के, निलेश मोरे , अनिल वावरे, बाळासाहेब धायतडक, अक्षय डांगरे, पप्पू रेवडकर, रविंद्र मोरे, विकास म्हस्के, महेश म्हस्के, ज्ञानेश्‍वर म्हस्के, दिपक म्हस्के, शरद म्हस्के, सोमनाथ म्हस्के, लक्ष्मण म्हस्के, गणेश म्हस्के, विजय म्हस्के, सुनिल म्हस्के तसेच भगूर गावामधील तरुण बांधवानी सहभाग घेतला.