Breaking News

रक्तदान ही काळाची गरज- गोरख दळवी

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान असून ती समाजाची गरज आहे. रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात. आजच्या तरुणाने विघातक मार्गाने जाण्यापेक्षा विधायक मार्गाने जाणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे दान सांगितले आहेत. त्यापैकी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ असून ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी केले. सोनेवाडी येथे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संभाजी ब्रिगेड संघटना, ग्रामस्थ, समस्त मित्र मंडळ यांच्यावतीने व जनकल्याण रक्त पेढी यांच्या समन्वयातून करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी निलेश लंके, दिलीप सुंबे, महादेव सुंबे,अंकुश दळवी, शिवाजी दळवी, गोवर्धन जाधव, रंगनाथ जाधव,रामभाऊ कराळे, राहुल लष्करे, कुमार दळवी,सागर दळवी,वासुदेव आमले, अभिजित गुंजाळ. धनंजय गुंजाळ, बाबा कुसाळकर, बाप्पू फोपसे,अजय गायकवाड,व समस्त तरुण वर्ग उपस्थित होता. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी रक्तदान केले. पुढे बोलताना दळवी म्हणाले कि वाढदिवस मोठ्या दिमाखात, पैश्याचा अपव्यय करून साजरा करण्यापेक्षा समाजहिताची कामे करून साजरा करावा हीच खरी समाजाप्रती बांधिलकी आहे. सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.