Breaking News

शेतातील बारे तोडल्यावरून हाणामारी ; १४ जणांविरुद्ध गुन्हा


संगमनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात शेतातील सायफनचे बारे तोडल्याच्या वादातून दोन गटात कुऱ्हाडीचा दांडा, दगड व लाथाबुक्यांनी जोरदार हाणामारी झाली. यात सातजण जखमी झाले. गुरुवारी ( दि. १४ ) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कौठेकमळेश्वर शिवारात जिजाबाई सूर्यभान भडांगे यांच्या जमिनीतील बांधालगत पुतण्या गंगाधर भडांगे यांनी ट्रॅक्टर घातला असता सायफनचे बारे तुटले. बांधावर ट्रॅक्टर घालून बारे का तोडले, असा जाब बाळू नाना भडांगे यांनी विचारला. त्यावर जिजाबाई भडांगे यांनी बारे तोडल्याची भरपाई करून देवू असे सांगितले. याच कारणावरून वादावादी होत आरोपी बाळू नाना भडांगे, शिवाजी बाळू भडांगे, ज्ञानेश्वर बाळू भडांगे, मंगल बाळू भडांगे, शारदा शिवाजी भडांगे ( सर्व रा. कौठेकमळेश्वर ) यांनी जिजाबाई भडांगे यांना भांडण सोडविण्यात गेलेल्या पती सूर्यभान कचरू भडांगे, मुलगा संतोष सूर्यभान भडांगे यांना दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत तिघेही जखमी झाले. तशा आशयाची फिर्याद जिजाबाई भडांगे यांनी दिली. पाचजणांविरुद्ध संगमनेर तालूका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक जांभूळकर अधिक तपास करीत आहेत.