Breaking News

‘साई आदर्श’ सर्वसामान्यांचा आधार ठरावा : हभप मंडलिक


राहुरी ता. प्रतिनिधी
साई आदर्श मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे संस्थापक शिवाजीराव कपाळे व त्यांच्या संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करत ठेवीदारांचा विश्वास संपादन केला. सचोटीची सेवा देण्याचा जो प्रयत्न केला, त्यातून आज संस्थेची उत्तरोत्तर भरभराट होत आहे. संस्थेने सुरु केलेल्या १७ शाखा व मुख्य कार्यालयातून ग्राहकांना उत्तम सेवा मिळून ही संस्था सर्वसामान्यांचा आधार ठरावा, अशी अपेक्षा श्री श्रेत्र नेवासा येथील संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केली.

येथील साई आदर्श मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या उंबरे शाखेच्या समारंभात प्रमुख उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे होते. व्यासपीठावर नागेबाबा मल्टीस्टेटचे कडूभाऊ काळे, दत्तात्रय आडसुरे, नामदेवराव ढोकणे, शामराव निमसे, गणेश भांड, बजरंग तनपुरे, साहेबराव दुशिंग, शिवसेनेचे विजय ढोकणे, विलास ढोकणे, सुनील अडसुरे, शहाराम अडसुरे, गंगाभाऊ ढोकणे आदी उपस्थित होते.

यावेळी सुरेश वाबळे, संत नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, संस्थेची ग्रामीण भागाशी नाळ जोडली आहे. पाच वर्षांतील आर्थिक प्रगती ग्राहकांच्या विश्वासाची पावती आहे.

कार्यक्रमास हसन सय्यद, पत्रकार रफीक शेख, श्रीकांत जाधव, संस्थेचे संचालक किशोर थोरात, डॉ. विलास पाटील, अविनाश साबरे, बाळासाहेब तांबे व संदीप तांबे, संतोष ढोकणे, अण्णासाहेब तारडे, ज्ञानदेव क्षीरसागर, किसन पटारे, तुकाराम दुशिंग, सोपान मगर, बाबासाहेब पागिरे, रंगनाथ गुंजाळ, बाळासाहेब डेंगळे, भाऊसाहेब शेजुळ, कुंडलिक ढोकणे, बाबासाहेब पटारे, गोरक्षनाथ ढोकणे, जालिंदर दुशिंग, विठ्ठल बारवेकर, रामभाऊ ढोकणे, विजय माळवदे, भाऊ सासवडे, गंगाधर अडसुरे, अर्जुन दुशिंग, मच्छिंद्र हुरूळे, संदीप अडसुरे, नानासाहेब ढोकणे, भाऊराव ढोकणे, बाळासाहेब ढोकणे आदींसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे महाराज यांनी केले. विष्णुपंत गीते यांनी आभार मानले.