Breaking News

निंबोडी शिवारात सापडला मानवी सांगाडा

तालुक्यातील निंबोडी शिवारात खोकर नदी पुलापासून काही अंतरावर पेट्रोल किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थाने अर्धवट जळालेल्या अवस्थेत व विद्रूप केलेला मानवी शरीराचा सांगाडा सापडला आहे. यामुळे माहिजळगाव सह परिसरात घबराहट पसरली आहे. याबाबत कर्जत पोलिसात उशिरा फिर्याद दाखल झाली.


तालुक्यातील निंबोडी शिवारात कर्जत-जामखेड रस्त्यावरील खोकरा नदीवरील पुलापासून माहिजळगाव च्या दिशेने काही अंतरावर असलेल्या माळरानात झुडपांमध्ये पट्रोेल किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थाने अर्धवट जळालेल्या अवस्थेत व विद्रूप केलेला मानवी शरीराचा सांगाडा सापडला आहे. सांगाडा पुरुषाचा असल्याचे प्रथमदर्शनी वाटते, सदर सांगाडा बाहेरून येथे टाकला की, कसे याबाबत सखोल तपास केला जाईल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. मात्र या घटनेनेबाबत दिवसभर माहिजळगावसह निंबोड, तरडगाव, सीतपूर, नागपूर, नागलवाडी, खडकत परिसरात अफवांचे पीक आले होते. याबाबत पोलीस तपास करीत असून कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. निश्‍चित माहिती नसताना अफवा पसरविणे हा गुन्हा आहे. असे काही आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी दिला आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शाहदेव पालवे हेही उपस्थित होते. 
जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी भेट दिल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रूगणालयात पाठविण्यात आला.