चिंचेचे लवन अंगणवाडीचे अखेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. दै. लोकमंथन आणि कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या लढ्यास यश
कर्जत तालुक्यातील कुळधरणनजीकच्या चिंचेचे लवन अंगणवाडीच्या इमारतीची दुरावस्था झाल्याने चिमुकल्या बालकांना अत्यंत धोकादायक स्थितीत शिक्षणाचे धडे गिरवावे लागत होते. जुन्या मोडकळीस आलेल्या खोलीत अनेक वर्षांपासुन अंगणवाडी भरत होती. वादळाने पत्रे उचकटल्याने ही इमारत चिमुकल्या बालकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे सचित्र वृत्त दै. लोकमंथनने प्रसिद्ध केले. याचा दणका एकात्मिक बालविकास विभागाला बसला. दै. लोकमंथनच्या वृत्ताची तात्काळ दखल घेत एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी शोभा तापकीर यांनी चिंचेचे लवन अंगणवाडीला भेट देवून पाहणी केली. इमारत अत्यंत धोकादायक झाल्याने त्याठिकाणाहून अंगणवाडीचे स्थलांतर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.त्यामुळे आता चिमुकली बालके सुरक्षित ठिकाणी शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत.
कुळधरण भागातील काही अंगणवाड्यांना अद्यापही पक्क्या इमारती नसल्याचे दिसून येत आहे. चिंचेचे लवन येथे जिल्हा परिषद शाळेजवळ असणार्या एका पत्र्याच्या खोलीत व जीर्ण इमारतीत अंगणवाडी भरत होती. भिंतीला जागोजागी तडे गेलेले असल्याने, इमारतीच्या बांधकामात घुसी व उंदरांचा वावर वाढला होता. ही गंभीर बाब दै. लोकमंथनने उजेडात आणली. कुळधरण ग्रामविकास संघटनेने चार महिन्यापुर्वी हा प्रकार उजेडात आणला होता. त्यावेळी जुजबी कार्यवाही करण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्या वर्षाराणी सुपेकर यांनी भेट देवून शेरेबुकात या संदर्भात नोंदी करुन प्रशासनाला सुचित केले होते.
चिंचेचे लवन येथील अंगणवाडीचे मधुकर सुपेकर यांची खोली भाडेतत्वावर घेवुन प्रश्न मिटविला असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी शोभा तापकिर यांनी दै. लोकमंथनशी बोलताना दिली.