शिर्डीसह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत
शिर्डी / प्रतिनिधी
शिर्डीसह राहाता परिसरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सुरु झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर
अचानक आलेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर ओढ्या-नाल्याला पूर आला होता. बाह्यवळण रस्त्यावर ही पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेल्या नळ्या लहान असल्यामुळे रोडवरच आणि साठले होते तर शिर्डीत निमगाव-निघोज परिसरात नगर-मनमाड रोडवर मोठ्या प्रमाणवर दोन्ही बाजूने गुडघ्याच्या वर पाणी आले. त्यामुळे काहीवेळ जनजीवन विस्कळीत झाले होते.
अनेक गावात काहींच्या कांदा चाळीततर काहींच्या घरात पाणी गेल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. शिर्डी पोलीस स्टेशनच्या २ एकर परिसरात पाणी साचल्यामुळे अनेक दुचाकी वाहने व पोलिसांच्या वाहनांना ही या पाण्याचा फटका बसला तर शिर्डी गेस्ट हाउसमधील एका खासदाराच्या अलिशान गाडीला ही या पाण्याचा फटका बसला झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते ना.राधाकृष्ण विखे पा. यांनीपंचायत समितीच्या अध्यक्ष हिराबाई कातोरे तहसीलदार आणिक आहेर अधिकाऱ्यांना घेऊन भेटी देऊनतत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले नगर-मनमाड रोडला काम करताना साईट गटारीचा आकार लहान असल्याने नगर-मनमाड रोडला प्रचंड पाणी साठले होते त्यामुळे वाहतूक काही तास बंद होते शिर्डीत ओढ्या नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने त्यालगत राहणारी झोपडपट्टीतील लोकांना ही याचा त्रास झाला मध्यरात्री पर्यंत हे लोक जागी होते शिर्डी शहरसहउपनगर याठिकाणी ही
मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेले दिसून येते मुसळधार पावसामुळे हजारो साईभक्तांनी मंदिर परिसराचा आश्रयघेतला ग्रामीण भागात राहाता तालुक्यात शासकीय अधिकाऱ्याच्यादुर्लक्षझाल्यानेओढे व नाल्यावर अतिक्रमण झाल्याने व वेळोवेळी साफ-सफाई न झाल्याने हे पाणी मोठ्या प्रमाणावर इतर भागात साठून नागरिकांना याचा फटका बसलायाची ही संबंधित अधिकाऱ्यांनी ही दखल
घेण्याची गरज निर्माण झाली आहे या पावसात ग्रामीण भागात काही रस्ते वाहून गेले तर काहींचे बांद तुटले काहींच्या घरात पाणी घुसले यात कांदा चाळीचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले काही ठिकाणी रस्त्यावर झाडे डिजिटल बोर्ड तुटून पडले होते या पावसाचा डोऱ्हाळे कानकुरी निमगाव निघोज सावळीविहीर आदींसह शिर्डीला या पावसाचा मोठा फटका बसला यात मोठे आर्थिक नुकसान झाले.