Breaking News

‘त्या’ पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!

मुंबई, दि. 24 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्ध झालेला पराभव आजही कोट्यवधी चाहत्यांच्या मनाला बोचत आहे. बुमराहनं  टाकलेला नो-बॉल हा या सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला होता. तोच नो-बॉल बुमराहची अजूनही पाठ सोडत नसल्याचं दिसतं आहे.
कारण की, जयपूरच्या ट्रॅफिक पोलिसांनी बुमराहच्या ‘नो बॉल’चं उदाहरण देत ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करणारे चक्क पोस्टर्स लावले आहेत. पण  या पोस्टर्समुळे बुमराह खूपच नाराज झाला आहे. जयपूर पोलिसांच्या या पोस्टरला बुमराहनं ट्वीटरवरुन उत्तर दिलं आहे. याबाबत बुमराहनं एक ट्विट करुन जयपूर  ट्रॅफिक पोलिसांना मार्मिक शब्दात सुनावलं. ‘अतिशय उत्तम जयपूर ट्रॅफिक पोलीस! तुम्ही दाखवून दिलंत की, देशासाठी आपलं सर्वोत्कृष्ट देण्यार्‍या खेळाडूबाबत  तुमच्या मनात किती सन्मान आहे.