Breaking News

महिला बचतगटांना ४५ लाखांचे कर्ज वाटप


कोपरगाव शहर प्रतिनिधी : 

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगांव तालुक्यातील २२ महिला बचतगटांना जिल्हा सहकारी, राष्ट्रीयकृत व खाजगी क्षेत्रातील बॅंकांकडून आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते ४५ लाख ५८ हजार रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.

महिलांचे सक्षमीकरण व त्यांचा आर्थीक पाया मजबूत करून व्यावसायिकता वाढविण्यांचे काम या माध्यमांतुन केले जात असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलतांना आ. कोल्हे यांनी केले.

प्रारंभी अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या कोपरगांव शाखेचे तालुका विकास अधिकारी कैलास गवळी प्रास्तविक केलेल. ते म्हणाले, जिल्हा बॅंकेचे संचालक बिपीन कोल्हे यांनी ग्रामिण भागातील शेतकरी, कष्ट्करी व महिला वर्गासाठी असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करून त्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यांचा प्रयत्न केला आहे. यासाठी बडोदा बॅंक, इंडियन ओव्हरसिज बॅंक, पोहेगांव, इंडिया बॅंक, चांदेकसारे, आयसीआयसीआय बॅंक, कोपरगांव, आणि जिल्हा सहकारी बॅंक कोपरगांव आदी बँकांचे सहकार्य लाभले. 

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, कोपरगांव तालुका महिला स्वयंसहायता बचतगट संस्थेच्या आशा नरोडे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.