Breaking News

२३ हजार ग्रामसेवकांच्या पगारात वाढ : ढाकणे


शिर्डी/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक योजने अंतर्गत डी.एन.ई. १३६ या संघटनेने २८ वर्षांपासून करत असलेल्या

पाठपुराव्यामुळे नगर जिल्ह्यातील १ हजार २०० राज्यातील २२ हजार अशा २३ हजार २०० ग्रामसेवक व ग्रामविकास

अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नानांच्या संबंधित आम्ही पाठपुरावा केला. त्यामुळे विविध प्रश्न मार्गी लागले. यामुळे ग्रामसेवकांच्या पगारात ३ ते ४ हजार रुपयांची पगार वाढ झाली आहे, अशी माहिती 

रू.चीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व राज्य सरकारचे सहकार्य मिळाळे आहे असे शिर्डी येथे बोलताना राज्याचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी सांगितले यावेळी ग्रामविकास अधिकारी आर. के. गायकवाड बाळासाहेब कडू रामदास डूबे रमेश सोमवंशी जालिंदर पाडेकर आदींसह ग्रामसेवक हजर होते

अध्यक्ष एकनाथ ढाकणे म्हणाले की कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ नियमित झाला त्याला २० कोटीच्या बजटची

मान्यता मिळाली याचा ४ ते ५ हजार हजार ग्रामसेवकांना फायदा झाला राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा होऊ नये त्याठिकाणी वाद शिवीगाळ भांडणाचे प्रकार होतात हे शासनाला दाखवून दिले सरकारने १५ ऑगस्ट २ ऑगस्ट १ मे या दिवशी ग्रामसभा न होता त्या महिन्यात होतील असा निर्णय घेतला रोजगार हमीचे कुशल पेमेंट लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय सुद्धा घेतल्या

गेला त्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या एका ग्रामसेवकाला आदर्श पुरस्कार याचा निर्णय झाला असून अंशदा पेन्शन योजना बाबतचा हिशोब ग्रामसेवकांना मिळणार आहे मागण्या मान्य झाल्या समाधान असून हे पाठपुरावा करताना आमचे सहकारी प्रशांत जामोदे राजू निकम उपायुक्तसूचित धरत यांचे सुद्धा सहकार्य लाभले येत्या दीपावलीच्या अगोदर शिर्डी सारख्या ठिकाणी २२ हजार ग्रामसेवकांचे भव्य अधिवेशन घेण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी चालू असून त्यात या कार्यक्रमात आमच्या अनेक मागण्या असून ७ वा वेतन आयोग मिळावा ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्वतंत्र वेतन श्रेणी मिळावी सुधारित आकृतिबंध दैनिक प्रवासभत्यात वाढ व ग्रामसेवकांचे शैक्षणिक अहर्ता पदवीधर करणे यासाठी आमच्या मागण्यांचा लढा असून हा महामेळावा यशस्वी होईल, असा विश्वास ढाकणे यांनी व्यक्त केला.