Breaking News

मुळानदीवरील बंधारे तातडीने भरून देण्याची मागणी


पानेगाव - जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे तसेच नेवासे चे आमदार बाळासाहेब मुरकुटे व राहुरीचे आमदार शिवाजी कडिँले यांनी तातडीने मुळा धरणाच्या पाण्यातुन नदीवरील भरायचे राहिलेले बंधारे मानोरी, पानेगाव -(मांजरी) अंमळनेर हे बंधारे लवकरात लवकर भरून द्यावे अशी मागणी मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप यांनी केली आहे. घोलप यांनी म्हटले आहे की , मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीने सातत्याने चार वर्षापासुन आंदोलने करून धरणाच्या 10% हक्काच्या पाण्यातुन बंधारे भरून मिळण्यासाठी तसेच बंधार्‍याचा फळ्यासाठी मुंबई मंत्रालयात पाटबंधारे विभागाचे मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे यांना भेटून सर्व अवगत परिस्थिती वस्तुस्थिती मांडली तसेच आमदार शिवाजी कडिँले, तसेच आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आजपर्यत मुळा धरणाच्या पाण्यातुन पुर्ण क्षमतेने बंधारे भरून दिलेले आहे. 

परंतु पाटबंधारे विभागाने उन्हाळी आर्वतन अगोदरच मुळाधरणाच्या पाण्यातुन हे बंधारे भरणे आवश्यक होते. पाटबंधारे विभागाला मुळा धरणातुन 14,400 दक्ष लक्ष घनफुट पाणी साठा कमी झाल्यावर धरणातुन पाणी नदीत पडत नाही. मग यामध्ये नेमकी चूक कोणाची .असा प्रश्‍न येथील शेतकर्‍यांना पडत आहे. या अगोदरच कृती समिती शिष्टमंडळाने पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना भेटुन नानासाहेब जुंधारे, डॉ. एकनाथ बाचकर, पोपटराव महानोर उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर बंधारे भरून देण्याच्या सुचना पाटबंधारे विभागाला केल्या होत्या .मोठ्या गाजावाजाने धरणातुन पाणी बंधारे भरण्यासाठी सोडल्यावर मुळाथडी परीसरात शेतकर्‍यांनी फटाक्यांच्या आतीषबाजीने जल्लोष केला होता.परंतु आज नदीकाठच्या शेतकर्‍यांना काळजीत पडले कि, बंधारे कशी भरणार या भागातील विहीर, कुपनलिका पुर्णपणे कोरड्या पडल्या असून बंधारे भरण्याची वाट शेतकरी पाहत आहे . मागिल पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस तसेच नदीला आलेले पाणी सुरुवातीला भरलेले पुर्ण क्षमतेने बंधारे त्यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर क्षेत्र बागायती खाली आणुन ऊस, घास, मका, आदी पिकांच्या लागवडी केलेल्या आहे. आज मात्र चित्र पुर्ण बदलले आहे. बंधारे भरल्याशिवाय पर्याय नाही. धरणातुन नदीवरील बंधारे भरण्यासाठी दुसर्‍या मार्गाने सुध्दा पाणी सोडता येत असल्याने वेळ वाया न घालता तातडीने पाणी सोडून राहिलेले बंधारे भरून द्यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.