'सर्जिकल स्ट्राईक' नाही तर 'फर्जिकल स्ट्राईक'- अरुण शौरी
भाजप सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण शौरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकारनं पाकिस्तानवर केलेला 'सर्जिकल स्ट्राईक' नाही तर 'फर्जिकल स्ट्राईक' आहे, अशी टीका शौरी यांनी मोदी सरकारवर केली आहे.