Breaking News

दोन दिंड्यांचा वाद हा वारकरी सांप्रदायाची प्रतिमा मलिन करणारा


पारनेर / प्रतिनिधी 
तालुक्याला लाभलेले संपुर्ण वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्री क्षेत्र पिंपळनेर हे प्रतिपंढरपुर म्हणून भाविक भक्तांना ऊर्जा देणारे, आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग दाखवणारा व भक्तीचा मोठा सागर प्राप्त करुन मानवजन्माच सार्थक करुन देणारी, संत श्री निळोबरायांची पावनभुमी या भूमिमध्ये येणारा प्रत्येक भक्त अलौकिक आनंदाचा अनुभव प्राप्त करत आहे. त्यामुळेच सरकारने याठिकाणच महात्म्य ओळखून हा परिसर मोठा खर्च करुन, सुशोभित केला आहे, खूप मोठे भक्तीचे सेवारुपी कार्य याठिकाणी पार पडत असताना, जो संतपरंपरंपरेचा आदर्श बाजुला ठेवुन, लहान-मोठा, मी-तू अशी भावना नष्ट करुणारा ठेवा बाजुला ठेवून, दोन दिंड्यांचा वाद आज चव्हाट्यावर येत आहे. हे भक्तपरिवारासाठी खूप दुःखद आहे. त्यामुळे याठिकाणच वातावरण खराब होत आहे. त्यामुळे भक्तीचा, सेवेचा विषय बाजूला जावून वेगळं वळण न देता, हा विषय त्याठिकाणच महात्म्य लक्षात घेवून हा वाद अंतर्गत संवादाने सोडवावा. सर्वांनी गुण्यागोविंदाने भक्तीरसाचा आनंद घ्यावा, आपल्या वारकरी परंपरेचा पारनेर तालुक्यातून मोठा आदर्श सर्वांसमोर ठेवावा ही भावना संपुर्ण संत निळोबाराय भक्तांकडून व्यक्त होत आहे.