Breaking News

समाजाच्या न्याय हक्कासाठी पदाधिकार्‍यांनी काम करा : खैरनार


राजूर / वार्ताहर 
अखील महाराष्ट्र सुतार, लोहार महासंघाची चिंतन बैठक प्रदेशाध्यक्ष सुदाम आण्णा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर येथे संपन्न झाली.
समाज संघटन ही काळाची गरज आहे. समाजाचा विकास करायचा असेल तर, समाजाने संघटित झाले पाहिजे. समाजात अनेक संघटना काम करतात. यासर्व संघटनांनी एकत्र येवून समाजाच्या विकासासाठी काम करावे, केवळ पदासाठी संघटनेचा वापर करू नये. समाजाच्या न्यायहक्कांसाठी सर्व पदाधिकार्‍यांनी काम करत राहिले पाहिजे असे मत या चिंतन बैठकीत सुदाम खैरनार यांनी मांडले.
या चिंतन बैठकीस खा. दिलीप गांधी होते. यावेळी त्यांनी सुतार समाजाच्या ज्या मागण्या असतील त्या, सरकारदरबारी मांडून त्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. या चिंतन बैठकीस अहमदनगर शहराच्या महापौर सुरेखा कदम उपस्थित होत्या. तसेच अध्यक्ष विश्‍वकर्मा फाउंडेशन धुळे येथील पी.जी.सुतार व प्रदीप जानवे, बाळासाहेब पांचाळ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, कोपरगाव तालुका अध्यक्ष पद्माकर भालेराव, पाथर्डी तालुकाध्यक्ष अशोक चन्ने, राहुरी तालुकाध्यक्ष स्वप्नील पगारे, गोरख गाडेकर, भाऊसाहेब आनंदकर आदी उपस्थित होते. या चिंतन बैठकीत दै. लोकमंथनचे पत्रकार भगवान पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास महामुनी यांनी तर, सूत्रसंचालन डॉ. दिलीप ताजवे व दत्तात्रय खैरनार यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी मांडले.