Breaking News

‘कर्मवीर भाऊराव पाटील’चा ८९.०९ टक्के निकाल


आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनचा दहावीचा निकाल ८९.०९ टक्के निकाल लागला. मुलींनी यंदाही निकालात नेत्रदिपक यश मिळवले आहे. यावर्षी इय्यत्ता १० वी.ची ११० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यात ९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील साक्षी संजय डोंगरे (९४ टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक प्रांजल दत्तात्रय दुर्गुर्डे (९१ टक्के), तृतीय क्रमाकं सृष्टी सुनिल सोनवणे (८८.४० टक्के) हिने मिळविला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, जि. प. अध्यक्ष शालिनी विखे, युवा नेते डॉ. सुजय विखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब भोसले आदींनी केले आहे.