Breaking News

टँकरच्या धडकेने घोंगते दांपत्य ठार


कोपरगाव शहर प्रतिनिधी 
राहत्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने जोराची धडक दिली. या अपघातात कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील बाळासाहेब ज्ञानदेव घोंगते { वय ५२} आणि त्यांची पत्नी शोभा बाळासाहेब घोंगते{ वय ४५ } हे दोघे जागीच ठार झाले. आज {दि. ११ } दुपारी हा अपघात घडला. या घटनेने तालुक्यातील टाकळी गावात शोककळा पसरली आहे.

कोपरगाव तालुक्यातील टाकळी घोंगते दांपत्य राहाता येथे धोंडा जेवण आणि नवजात नातवंडाला भेटायला जात होते. कोपरगाव- शिर्डी महामार्गालगतच्या तीनचारी कोकमठाण शिवारात मागून येणाऱ्या टँकरने {क्र. आर. जे. १९ जीसी ८९७७} त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हे दांपत्य रस्त्यावर पडून त्यांच्या अंगावरून टँकर गेल्याने ते ठार झाले आहे. यावेळी घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले. मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सदर टँकर पोलिसांनी जप्त केला असून चालकास ताब्यात घेतले. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली.