विदर्भ राज्य निर्मितीच्या दिशेने वाटचाल करावी - रामदास आठवले
भंडारा, दि. 17, फेब्रुवारी - स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र व राज्यात भाजपचे राज्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीच्या दिशेने वाटचाल करावी, असे रोखठोक मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत रामदास आठवले बोलत होते.
महाराष्ट्रात राहून विदर्भाला न्याय मिळू शकत नाही. औद्योगिक विकास परिणामत: रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या हेतूने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे नितांत गरजेचे आहे. भाजप विदर्भ राज्य व्हावे यासाठी अनुकूल मताचे आहे. आणि ही बाब विदर्भ राज्य निर्मितीसाठी महत्वाची भूमिका वटवू शकते. मेघालय, त्रिपुरा व नागालँड राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुका संदर्भात बोलताना आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आपले उमेदवार उभे केले आहेत. यासाठी भाजपचे समर्थन दिले आहे. एनडीए घटक दलाचे सदस्य असल्याने अन्य राज्यातही भाजपचे राज्य यावे, असेही ते म्हणाले. 2019 च्या निवडणुका संदर्भात ते म्हणाले की, राज्यात भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पक्ष मिळून निवडणूक लढविली पाहिजे. एकला चलो रे या भूमिकेमुळे अपेक्षित परिणाम मिळणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून भाजपची शिवसेने बाबत असलेले नाराजगी दूर करावी, असे मत व्यक्त केले आहे. येणा-या काळात केंद्रात भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा आशावादही आठवले यांनी व्यक्त केला.