अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात
राहुरी प्रतिनिधी,
शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. सकाळी ८ वाजता शहरातील बिरोबा मंदिर येथून राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब पारखे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपिठावर डाँ. प्रताप गिरगूणे, राहुरी नगरपरिषदचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार, डाँ. स्वप्निल माने, सोमनाथ बाचकर, सुनिल माने, संजय खेडेकर, आर. डी. माने, अण्णासाहेब बाचकर, रावसाहेब तमनर, काशिनाथ खेडेकर, ज्ञानेश्वर बाचकर, दत्तात्रय खेडेकर, बाळासाहेब माने, पोपट शेंडगे, डाँ. सुभाष मोरे, अप्पा सरोदे, भाऊसाहेब विटनोर, दादाभाऊ तमनर, संतोष नजन आदी उपस्थित होते.