Breaking News

गावातील समस्या सोडवण्यासाठी सबंधीत मंत्र्यांशी चर्चा

पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी । 
गावाचा विकास करायचा असेल तर, आदर्श समोर ठेवूनच विकासात्मक धोरणे राबविणे योग्य असते. गवत उगण्यास पावसाची एक सर खुप होते. पण वटवृक्ष उगवण्यासाठी उशीर लागतो. तेच वटवृक्ष चिरकाल टिकतात. म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणार्‍या लोकांपेक्षा वटवृक्षा सारख्या खंबीर असणार्‍या लोकांचे सानिध्य नेहमी दिशादर्शक ठरते. याच उदात्त भावनेतून पिंपळगाव नाकविंदा(ता. अकोले) येथील समविचारी, कर्तव्यनिष्ठ अन् ध्येयवादी विचारांचे ग्रामस्थ यांनी ग्रामविकासाच्या ध्येयपूर्तीसाठी राळेगणसिद्धी येथे क्षेत्र भेटीचे आयोजन केले.
याप्रसंगी राळेगणसिद्धी येथील पाणलोट क्षेत्र, ग्रंथालय, सौरऊर्जा प्रकल्प, ग्रामपंचायत कार्यालय, माहिती केंद्र, पुरस्कार तसेच गाव विकासातील कामांचे फोटो यांसारखे संग्रालय, कुर्‍हाड बंदी, चराई बंदी यांसारखे ग्रामविकासात्मक पुस्तके यांसारख्या भागांची पाहणी केली.
यानंतर प्रत्यक्षात या ठिकाणी अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पिंपळगाव नाकविंदा येथील सौर ऊर्जा प्रकल्प तसेच विजेचा प्रश्‍न, उपसा सिंचन योजना यांसारख्या समस्या यावर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी अण्णा हजारे यांनी ऊर्जा मंत्री तसेच सबंधीत अधिकार्‍यांशी चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहुन विकासात्मक कामांसाठी योग्य ते सहकार्य तसेच मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन दिले.
तसेच चांगल्या विचारांचे व्यक्ती भेटल्याचा आनंद व्यक्त करत स्वप्न सुंदर बनवण्यास राळेगणसिद्धी प्रमाणे सुरुवात करण्याचे मार्गदर्शन केले.
या क्षेत्र भेटीसाठी सेवानिवृत्त कृषी आधिकारी तुळशिराम बगनर, मारूती काळे, वाळीबा लगड, माधव बोर्‍हाडे, सुभाष बगनर, ग्रामसेवक गौतम जानेकर, मारूती आभाळे, भास्कर काळे, नवनाथ लगड, संतोष काळे, सुभाष आभाळे, विश्‍वास पथवे, राम लगड, वाळीबा लगड, पाटीलबुवा लगड, शिवराम सदगिर, देवराम बगनर, जालिंदर मोहिले, काळू धनगर, नवनाथ बगाड, सदाशिव आढळ, नारायण आभाळे यांसह आदी ग्रामस्थांचा राळेगणसिद्धी क्षेत्रभेटीत सहभाग होता.