Breaking News

अतिक्रमणाविरोधात आंदोलनाचा इशारा

जामखेड / ता.प्रतिनिधी । जामखेड तालुक्यातील नान्नज येथिल इंदिरानगरमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करुन भिंत बांधण्यात आली असून, पाण्यासाठी खड्डे व रस्त्यावरच झाडे लावण्यात आली आहेत. मोठे दगड ठेवल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ही अतिक्रमणे त्वरित हटवण्यात यावीत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांंनी ग्रामविकास अधिकारी एम पी. शेख यांना दिलेल्या निवेदनात केला. 5-6 महिण्यांपुर्वी इंदिरा नगर रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने निवेदन दिले होते, ग्रामविकास अधिकारी यांनी हटविण्याचे आश्‍वासनही दिले होते, मात्र त्यास केराची टोपली समजली गेली, तर इंदीरनगर ग्रामस्थांनी दुसरा निवेदन ग्रामविकास अधिकारी व संरपच यांना दिले आहे. आता तरी संरपच व ग्रामविकास अधिकारी यांनी संबंधितांना नोटीस देवून नविन गटार व रस्ता होण्यापुर्वी अतिक्रमण काढावयास सांगावे अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. 
निवेदनात म्हटले आहे की, इंदिरानगरमधील काही नागरिकांनी रस्त्यावर पाण्यासाठी खड्डे खोदले असून काहींनी, रस्त्यापर्यंत भिंत बांधली आहे. या निवेदनावर अनिल भोसले, भिम आर्मीचे तालुकाध्यक्ष शरद साळवे, समीर शेख, सतीश जगताप, भिवा साठे, अमोल साठे, संदीप सोनवणे, भाऊसाहेब साठे, रियाज चाऊस, जावेद शेख, लखन साठे, शांतीराज साळवे, विश्‍वराज भवाळ, आबा कांबळे, भागवत सोनवणे, दत्ता कांबळे, राजेंद्र साठे, सखाराम जगताप, संदीप सोनवणे, मधूकर साठे, उत्तम जगताप, रामचंद्र साठे, आदेश आव्हाड, दादा साठे, यांच्यासह सत्तावीस ग्रामस्थांच्या सह्या आहेत.