Breaking News

जामखेड मध्ये पावसाची जोरदार हजेरी

जामखेड / श. प्रतिनिधी 
जामखेड शहरासह तालुक्यात काल रोजी सायंकाळी पावसाला जोरदार सुरवात झाली. चोहिकडे पावसाचे पाणी साचले. त्यामुळे परीसरातील ज्या शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहेत. त्यांना दिलासा मिळाला आहे. दि.21 रोजी जामखेडला 31मिमी, नायगाव 35मिमी, खर्डा 38 मिमी, आरणगाव 07 मिमी, नान्नज 19 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली. 
मागील दहा दिवसांपासुन पावसाने दडी मारली होती. परिणामी शहरात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी, अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात तब्बल 135 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 
सायंकाळी अचानक ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. अर्धा तास शहरात पाऊस झाला असल्याने, मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते. अचानक पावसाच्या तुफानी आगमनाने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी ऊन पडल्याने निसर्गात चैतन्यमय वातावरण निर्माण होते. 
आत्तापर्यंत जामखेड शहरात 135 मिमी, नायगाव येथे 110 मिमी, अरणगांव 33 मिमी, तर खर्डा 131मिमी अशी पडलेल्या पावसाची नोंद आहे.