Breaking News

श्री छत्रपती विद्यालयाचा 95 टक्के निकाल


जवळा / प्रतिनिधी 
राज्य माध्यमिक शिक्षण मडंळाच्या वतीने मार्च 2018 मध्ये 10 वीच्या बोर्ड परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या निकालाची उज्चल परंपरा यंदाही कायम राखली असुन विद्यालयाचा एकुण शेकडा निकाल 95.30 टक्के लागला आहे. तब्बल 30 विद्यार्थ्यांनी 85 टक्केंंपेक्षा गुण मिळविले आहेत.
परीक्षेला सामोरे गेलेले 128 पैकी 123 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विद्यालयातून गुणाक्रमे प्रथम आदित्य विजय शेळके (91.60 टक्के), द्बितीय प्रसाद नवनाथ वायकर (91.40 टक्के), तृतीय शिवांजली श्रीराम जाधव (90.80 टक्के) आले. शाळेतून तब्बल 30 विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यापेक्षा गुण प्राप्त करून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित तासांसोबत, विशेष मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक वर्गाने यासाठी परिश्रम घेतले. जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, ज्योती क्रांतीचे चेअरमन आदिनाथ हजारे, जवळा वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील मा. सरपंच प्रदीप दळवी, जवळा गावचे सरपंच अनिल पवार, उपसरपंच गौतम कोल्हे, युवा नेते प्रशांत शिंदे, शरद हजारे, उमेश रोडे, शशिकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राऊत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाजी वांळुजकर, जवळा विकास समुहाचे किरण हजारे, प्रफुल्ल कोकाटे, संदेश हजारे, मुकूंद रोडे, सावता हजारे, अशोक पठाड़े यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.