‘प्रवरा’तर्फे २३ ला जॉब फेअरचे आयोजन
प्रवरानगर प्रतिनिधी
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये येत्या शनिवारी {दि. २३} भव्य प्रवरा जाॅब फेअर -२०१८ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आणि प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.
ते म्हणाले, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे जॉब फेअर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये विविध शाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनीला नोकरी मिळण्याची संधी आहे. अभियांत्रिकी विभागातील बी. ई. मेकॅनिकेल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन,डिप्लोमा इन मेकॅनिकल, अॅटोमोबाईल, आयटीआयमधील कुठल्याही ट्रेडचे विद्यार्थी, एमबीए, बीबीए आणि बॅकीग व मार्केटींग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी या जाॅब फेअरमुळे संधी उपलब्ध होणार आहे. या जाॅब फेअरच्या अधिक माहितीसाठी {मो. नं. ९९२११७०६६३ आणि {मो. नं. ९४२३७८७४५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
