धांदरफळ येथे अवैध देशी दारू जप्त
।संगमनेर / प्रतिनिधी।
तालुक्यातील धांदरफळ शिवारात अवैधरित्या देशी दारू विक्रीप्रकरणी पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले. खंडू बबन म्हस्कुले पोलिसांनी पकडलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी दारूच्या १५ बाटल्या जप्त केल्या.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरून आज दि. २० दुपारी साडे बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. खंडू म्हस्कुले हा तालुक्यातील धांदरफळ शिवारातील गोडशेवाडी येथे अवैधरित्या देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करीत होता. पोलीस नाईक अनिल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरक्षक घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. आहेर करीत आहेत.
