Breaking News

योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम : सुरवसे


कोपरगाव प्रतिनिधी 

योगामुळे शरीर सुदृढ बनून चांगले जीवन जगता येते. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते, असे मत प्राचार्या सुरवसे एम. एस. यांनी व्यक्त केले. 

कोपरगाव येथील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या सुरवसे, उपप्राचार्य गवळी बी.के., पर्यवेक्षिका राजेभोसले एम. डी. यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक रमेश मोरे यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आत्मा आणि परमात्मा यांचा संयोग म्हणजे योग होय. योगामुळे स्मरणशक्ती वाढून सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थिनीकडून त्यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले. विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योग प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक राठोड के. पी., निकम एन. वाय., शिंदे आर. आर., वाकचौरे व्ही. जे. नीळकंठ पी. ए., हरिदास एम. पी., साबळे एस. आर. यांनी परिश्रम घेतले. उपप्राचार्य गवळी बी. के. यांनी आभार मानले.