Breaking News

तरुणांनी सामाजिक कार्यात पुढे यावे - गर्जे


पाथर्डी ( प्रतिनिधी ) 
ग्रामीण भागातील तरुणांनी सकारात्मक विचारधारा ठेवून जीवनाची वाटचाल केली पाहिजे. आज तरुणांनाचा देश म्हणून भारताकडे पहिले जाते. जर तरुणांनी काही करण्याचे ठरवले तर ते काही ही करू शकतात . फक्त राजकारणापुरते तरुणांनी आपली सीमा न ठेवता सामाजिक कार्यात पुढे यावे. असे आवाहन भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी केले . तालुक्यातील मालेवाडी येथील डॉ. अक्षय खेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, स्री जन्माचे स्वागत शपथ प्रतिज्ञा व अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते . 
गर्जे पुढे म्हणाले की युवकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भरीव असे काम केल्यास त्यातून अनेक समस्यां दूर होऊन बळीराजाच्या अडचणीं दूर होऊन चांगली शेती करता येऊ शकते . केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहचवण्याचं काम आपण केल्यास त्याचा फायदा सर्वांना होईल .शेतकरी टिकला तर आपण टिकू आणि यातून आपला फायदा नक्कीच होईल. याप्रसंगी प.स.सदस्य. किरण खेडकर , महारुद्र किर्तेने , अजिनाथ दराडे , कपिल खेडकर , अशोक बांगर , योगेश जवरे , अविनाश जवरे , कृष्णा जाधव , सुधीर फुंदे , विशाल जवरे , मयूर जवरे , पिराजी फुंदे ,भाऊसाहेब बांगर , सोन्याबा बटुळे , संदीप अधुरे , मोहन दराडे , दिलीप जवरे , ज्ञानेश्वर धावड, निखिल खेडकर , संपत खेडकर , संदीप अधुरे आदीं उपस्थित होते .