विहिरीत पडून दोघांचा मृत्यू
जामखेड तालुक्यातील पाडळी येथे 9 वीत शिकणार्या संध्या चंद्रकांत सुर्वे व मतेवाडी येथील मच्छिंद्र केरबा कसरे या दोघांचा वेगवेगळ्या घटनेत विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात या दोघांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पहिल्या घटनेत तालुक्यातील पाडळी येथे आपल्या मामाकडे शिकण्यासाठी असलेल्या इयत्ता 9 वी मध्ये शिकत आसलेल्या संध्या चंद्रकांत सुर्वे (मुळ गाव, बसरवाडी, ता. जामखेड) ही पाडळी येथील, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9 वी च्या वर्गात शिकत होती. काल रोजी योग दिन असल्यामुळे सर्व शाळा सकाळी भरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुपारी शाळेला सुट्टी असल्याने ही दुपारी 2 च्या दरम्यान, आपल्या पवार वस्ती जवळील शेतात गेली होती. काही वेळाने जवळच असलेल्या विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता, ती पाण्यात पडली. यानंतर तीचा घरच्या लोकांनी व परिसरातील ग्रामस्थांनी रात्रभर शोधाशोध केली, मात्र ती आढळुन आली नाही. दुसर्या दिवशी तीचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसून आला.
दुसर्या घटना ही तालुक्यातील जवळा शिवारातील मतेेवााडी येथे मच्छिंद्र केरबा कसरे, वय 65, हे काल दुपारी आपल्या शेतातील विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांचा पाणी घेतावेळ विहीरीत तोल गेल्याने ते विद्युत मोटारीसाठी असणार्या लोखंडी चौफाळ्यावर पडले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागुन, पुन्हा विहीरितील पाण्यात पडले. त्यामुळे त्यांचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही मृतदेहांचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करून, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण हे करत आहेत.