ग्राम सुरक्षा दलाचे काम मंदावले
शेवगाव / प्रतिनिधी । 23 ः
अहमदनगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यात महाराष्ट्र शासनाचा अतिशय धाडसी निर्णय म्हणून ग्राम सुरक्षा दलाकडे पाहिले जाते. या उपक्रमाची तहसीलदारांसह तालुक्यातील प्रमुख अधिकार्यांच्या गावोगावी बैठकाही झाल्या. काही ठिकाणी या निर्णयाचे स्वागत झाले तर, काही गावांमध्ये स्थानिक नागरिकांकडून झालेल्या प्रश्नांच्या भडीमाराला तहसीलदारांसह आदी अधिकारी निरुत्तर झाले. तालुक्यातील बक्तरपुर वगळता कुठेही ग्रामसुरक्षा दल स्थापन झाल्याचे दिसत नाही. ग्रामसुरक्षा दलाची शासनदरबारी निर्णय व राबविण्यात येणार्या योजना अतिशय महत्वाच्या आहेत. मात्र ग्राम सुरक्षा दलाचे काम का मंदावले असा प्रश्न आता गावा-गावातील नागरिक करत आहेत.
सध्या जिल्ह्यासह राज्यात किडनी चोरांच्या अफवेचे पेव फुटले आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यासह गावातील लोक रात्र जागून काढत तर, ग्रामीण भागातील मुलांना तालुक्याच्या ठिकाणी शाळेत पाठवायला पालक वर्ग घाबरत आहे. मात्र भीतीच्या सावटाखालून सावरण्यासाठी अद्यापही शासनस्तरावर कुठल्याही प्रकारचे पाऊले उचलली गेली नाहीत. याकामी ग्रामसूरक्षा दलातील तरुणांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली असती, मात्र याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. तसेच या तरुणांना पोलीस स्टेशन मार्फत बॅटरी, शूज, नाईट ड्रेस तसेच ग्रामरक्षक तरुणांचा हॉटस्अप मोबाईल गृप तयार करून, तालुक्यामध्ये होणार्या घटनांची माहिती घेता येईल, तसेच त्यांना ओळखपत्र देण्याची गरज आहे. जेणेकरून रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात या तरुणांची मदत होईल. म्हणून ग्राम सुरक्षा दलाच्या या धाडसी निर्णयाला गती देऊन त्या कार्यान्वित कराव्यात अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती ग्रामसुरक्षा दलात सहभागी होत नाहीत, त्या ग्रामपंचायती ग्रामसुरक्षा दलामध्ये का कार्यान्वित होत नाहीत? याची चौकशी शेवगाव पोलिस स्टेशनकडून करण्यात यावी. लवकरात लवकर हे ग्रामसुरक्षा रक्षक पोलिसांच्या मदतीला यावेत अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे तर, काही गावातील तरुण या कामासाठी इच्छूक आहेत. परंतु शासन दरबारातून कुठल्याही हालचाली गती घेत नसल्यामुळे सध्या हा कारभार चालला की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
तालुक्यातील अनेक लहान-मोठ्या देवस्थानांची शासनदरबारी नोंद आहे. परंतु काही देवस्थानची शासन दरबारी नोंद नाही, अशा देवस्थानाकडे दानपेटीच्या मध्यमातून जमा होणारी रोख स्वरूपातील रक्कम ही भुरट्या चोरांची लक्ष बनत आहे. परंतु गावोगावी ग्रामसुरक्षा दल नसल्यामुळे याकडे कोणीही जबाबदारीने लक्ष देत नाही, त्यामुळे मध्यंतरी अनेक देवस्थानच्या दानपेटी फोडण्याचा प्रकार घडले आहेत. परंतु शासन दरबारी देवस्थानाची नोंद नसल्यामुळे अशा प्रकारच्या चोर्यांचे पोलीस दरबारी नोंदी झालेले नाहीत. यासाठी ग्राम सुरक्षा दलाच्या कार्याला गती मिळावी अशी मागणी होत आहे.