संकटांवर मात करून राणी जायभायचे यश
जामखेड / श.प्रतिनिधी । 23 ः
राणी जायभाय या विद्यार्थिनीने बिकट परिस्थितीत कुटूंबावर आलेल्या संकटांवर मात करून काम करून अभ्यास केला, दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवून, सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.
नुकत्याच शालांत परीक्षेचा निकालात जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील राणी जायभाय या विद्यार्थिनीने घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 10 वी मध्ये 91 टक्के गुण मिळवून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरली आहे. तिच्या मनात शिक्षण घेण्याच्या मोठ्या महत्त्वाकांक्षा आहेत, तिची पुढील शिक्षणासाठी घरची आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्याने तीला एच.यु गुगळे पतसंस्थेमार्फत 11 हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. घरच्या बिकट हालाकीच्या परिस्थितीत शेतात मजूरी करून अभ्यास केला. 10 वीत 91 गुण मिळविल्याबद्दल एच.यु गुगळे पतसंस्थेच्यावतीने तीचा अर्थिक मदत देवून सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला, यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे बोलत होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन रमेश गुगळे व विजया गुगळे, बँकेचे मॅनेजर वैभव कुलकर्णी, जूबेर पठाण, मिलिंद भिडे, सारिका इंगळे, शाम पंडीत, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.