शनिवारी सीनानदी पात्रातील पक्के अतिक्रमणे हटविले
अहमदनगर/प्रतिनिधी।
सीनानदी पात्रातील अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून कल्याण महामार्गावरील रेल्वे पुलाजवळ असणारे पत्र्याचे शेड व पक्के बांधकामे हटविण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानंतर सीनापदी पात्रातील अतिक्रमण मोहिम गेल्या 9 दिवसापासून सुरु आहे. विशेष म्हणजे एका ठिकाणचे पक्के बांधकाम सुध्दा पाडण्याची कारवाई करण्यात आली होती. पण त्याला तात्पुरती स्थगिती मिळाली होती. सध्या चार जेसीबी आणि दोन पोकलेनच्या साहाय्याने अतिक्रमण काढले जात आहे. सकाळपासूनच नदीपात्रातील माती व गाळ काढण्याची प्रक्रीया सुरु होती.काल शहरमाध्ये जोरदार पाऊस पडल्याने थोड्याप्रमाणात अडथळा आला होता. पण आज कल्याण महामार्गावरील रेल्वे पुलापाशी दहा ते बारा ठिकाणचे असलेले पक्के बांधकाम पाडण्यात आले आहे. जेसीबीच्या सहाय्याने हे पक्के बांधकाम काढण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी पत्र्याचे शेडसुध्दा उध्वस्त करण्यात आले. हा परिसर मोकळा करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरुच होती.