Breaking News

’योगाभ्यास’ जीवनाचा भाग होणे आवश्यक - प्रा. देशमुख

अकोले / प्रतिनिधी । 
योगक्रियेसंबंधी सजगतेचा संदर्भ, पुरावे ऋग्वेदात आढळतात. याचाच अर्थ असा की, प्राचीन काळापासूनच असलेले योगाचे महत्व नाकारता येणार नाही. अभिनव शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढीच्या दृष्टीने योगाभ्यास नियमित घेतला जातो. त्याच योग क्रियेची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेत 21 जून जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केल्याचे अभिनव शिक्षण संस्थेच्या सी.बी.एस.ई. च्या डायरेक्टर प्रा. जयश्री देशमुख यांनी सांगितले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अभिनव शिक्षण संस्थेच्या वसुंधरा अकॅडमी, मारुती कोते, अभिन पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वसुंधरा अकॅडेमी, राजूर येथील सह्याद्री व्हॅली इंग्लिश मेडियम स्कूल, कोतूळ येथील मुळा व्हॅली इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी, कॉलेज ऑफ सायन्स , एम.बी.ए. व सर्व विभागातील शिक्षकांसाठी विविध योगासने, प्राणायाम प्रात्येक्षिके घेण्यात आली. अकोल्यातील अभिनव संकुलाच्या प्रांगणात मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्रा. अल्फोन्सा डी., प्रा. अपर्णा श्रीवास्तव, राधिका गडाख, अभिनव कॉलेज ऑफ सायन्सच्या प्रा. दीप्ती शेटे, ज्युनिअर कॉलेजचे विभागप्रमुख प्रा. पांडुरंग गुंजाळ, वसुंधरा अकॅडमीचे प्रा. लक्ष्मीकांत आहेर, क्रीडा शिक्षक ऋषिकेश वालझाडे, आदिनाथ आभाळेंसह आदी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, उपाध्यक्ष सुरेश कोते, सचिव प्रा. रमेशचंद्र खांडगे, खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी तसेच सर्व प्राचार्य, विभागप्रमुख यांनी कौतुक केले.