Breaking News

रस्ता बनविण्यासाठी पांढरी माती, शाडूचा वापर तब्ब्ल 3 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी


तालुक्यातील भीमा नदीच्या काठच्या गावांना जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 3 साठी, राज्याच्या 2017 च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या विविध ठिकाणी मजबुतीकरण व दोन वर्षापर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 3 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मिळाला, यातून निमगाव खलु ते अजनूज, मार्गे शेडगाव रस्त्याच्या पहिल्या टप्प्यात कामासाठी खडीबरोबर पक्का मुरूम मिळत नसल्याने ठेकेदारांनी चक्क चुनखडीचा (पांढरी माती, शाडूचा) वापर सुरु केल्याने कायम दलदलयुक्त राहणार्‍या या रस्त्याचे काम मजबूत होणार का असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 
श्रीगोंदा तालुक्यातून वाहणार्‍या भीमा नदी काठच्या गावांना जोडणारे रस्ते कायमच खराब होत असल्याने प्रजिमा क्र. 3 च्या कामासाठी याची दखल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेत, या रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारने 2017 साली तब्ब्ल 3 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. हा रस्ता वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी सुस्थितीत राहावा यासाठी, विविध ठिकाणी मजबुतीकरण व दोन वर्षांपर्यंत दुरुस्ती साठी मिळालेल्या निधीतून या रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र कामाची गुणवत्ता राखताना अनेक ठिकाणी तडजोड करत साहित्याचा वापर कमी अधिक प्रमाणात करण्यात आला असला तरी, रस्त्याच्या कामासाठी पक्का मुरूम मिळाला नसल्याने चक्क चुनखडीचा, शाडूच्या, मातीचा वापर करण्यात आला असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. या रस्त्यावर कायम अवजड वाहतूक होत असल्याने हा रस्ता मजबूत होणे गरजेचे असताना, इतका मोठा निधी येऊनही कामाची गुणवत्ता राखली जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. 

या रस्त्याच्या कामासाठी पक्का मुरूम का वापरण्यात आला नाही, तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड का करण्यात येत आहे. कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी, कर्मचारी, अभियंता का उपस्थित राहत नाही, याबाबत विचारांना संबंधित काम पाहणारे, कनिष्ठ शाखा अभियंता सूर्यकांत पाटील यांच्याकडे चौकशी केली असता, मला काही माहिती नाही ठेकेदारांना सूचना दिल्याने, याची माहिती उपविभागीय अभियंता बनकर यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. 
फोटो ; रस्त्याच्या कामात मुरूम ऐवजी चक्क शाडू मातीचा वापर केला जात आहे .