Breaking News

वारणवाडी सबस्टेशनसह मांडवे खुर्द फिडरचे काम निकृष्ट

सुपा / प्रतिनिधी
पारनेर-संगमनेर हद्दीवर असणार्‍या मुळा नदीकाठच्या गावासाठी दोन महिन्यापुर्वी वारणवाडी येथे महावितरण कंपनीने कडुन वीज उपकेंद्र उभारण्यात आले. मात्र या उपकेंद्रावर मांडवे व देसवडे या गावाकडे जाणारे फिडर बसविण्यात आले. सदर कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून आल्याने, निकृष्ट कामाच्या संदर्भात मांडवे ग्रामस्थांनी पारनेर येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात 6 तास ठिय्या आंदोलन केले. ग्रामस्थांच्यावतीने जि.प. सदस्य काशीनाथ दाते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले व शिवसेना ता.प्रमुख विकास रोहकले यांनी उपकार्यकारी अभियंता आडभाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर महावितरण कंपनीने लेखी पत्र दिले, त्यामध्ये येत्या सोमवारपर्यंत काम व्यवस्थित करुन देण्यात येईल असे सांगितले. 
निवेदनावर पांडुरंग गागरे, यशवंत जाधव, भाउसाहेब गागरे, बाळासाहेब हारदे, गोरख मिंडे, नामदेव गागरे, संतोष गागरे, रामदास आहेर, संपत गागरे, बाळु गागरे, विकास गागरे, श्रीरंग गागरे, संपत गागर, विनायक जाधव, बाजीराव गागरे, देवराम हारदे, शरद जाधव, सुर्यभान गागरे, बाळु गागरे, भाऊसाहेब गागरे आदिंच्या सह्या आहेत.