कराड अर्बन बँक वाहनकर्ज घोटाळा प्रकरण तपास अंतिम टप्प्यात : पो. नि. शिंदे
कराड/प्रतिनिधी
दि कराड अर्बन को ऑप. बँकेच्या पुणे शाखेत वाहन वितरण कर्ज प्रकरणात लाखो रूपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी दोषी बँकेचे वरीष्ठ अधिकारी व संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची चौकशी अंतीम टप्प्यात आली असुन थोड्याच कालावधीत संबंधीत दाषींवर कारवाई करण्यात येईल, असे पुणे येथील विश्रामबाग पोलिस स्थानकाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शरद देव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान कराड अर्बनच्या ठेवीदार सभासदांच्यात जनजागृती करण्यासाठी आम्ही कराड येथील मुख्य कार्यालयासमोर कंदील घेऊन आंदोलन करणार असल्याचेही सांगितले यावेळी संजय चव्हाण, दशरथ धोत्रे, गोरख शिंदे, संजय तडाखे, अशोक पाटील, दशरथ पवार यांच्यासह इतर कार्यकत्यार्ंंची उपस्थिती होती.
शरद देव पुढे म्हणाले, बँंंकेचे संचालक मंडळ हे ठेवीदार सभासदांचे रक्षक असते. बॅकेंच्या सर्व सभासद ठेवीदारांनी सदर संचालकांवर विश्वास ठेवलेला असतो, असे असताना को. ऑप. बँकेच्या पदाधिकारी संचालक मंडळाने सभासद ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे. कर्जे देताना त्यांनी कोणतेही तारतम्य ठेवलेले नाही. पुणे शाखेत वाहन कर्ज वितरणात त्यांनी बोगस कागद पत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले आहे. त्यासंदर्भात पुणे येथिल बँकेचे वरिष्ठ अधिकारी व बँकेच्या संचालक मंडळावर सहकार आयुक्तांनी चौकशी अंती विश्रामबाग पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलिस अधिकारी एम. डी. पाटील यांच्या कडे आहे. परंतु त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास चालु असल्याचे सांगुन तपासात दिरंगाई केली आहे. या कारणावरून सामाजिक कार्यकर्ते शरद देव व त्यांच्या सहकार्यांनी पुणे येथील विश्रामबाग पोलिस स्थानकासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते शरद देव व त्यांच्या सहकार्यांनी दि. 26 जून रोजी विश्रामबाग पोलिस स्थानकात प्रत्यक्ष जावुन अर्बन प्रकरणाची माहिती घेतली. तेव्हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी दि. कराड अर्बन को ऑप बँकेचा तपास अंतिम टप्प्यात असल्याचे सांगुन थोड्याच दिवसांत संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले त्यामुळे आमचे आंदोलनाचे नियोजन पुढे ढकलण्यात आल्याचे शरद देव यांनी शेवटी सांगितले.