अपयश झाकण्यासाठीच आणीबाणीची आठवण : शरद पवार
पुणे : गेल्या चार वर्षात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप सरकारला 44 वर्षानंतर आणीबाणी आठवत असल्याची टिका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या राजषी शाहू अकॅडमीच्या वतीने शाहू महाराजांच्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर पवार पत्रकरांशी बोलत होते. गेल्या चार वर्षात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आता 43 वर्षांनंतर आणीबाणी आठवत आहे, वाजपेयींचा पाच वर्षात आणबाणीची कधी आठवण आली नव्हती असेही पवार यावेळी म्हणाले.