Breaking News

मोदी सरकार मुठभर श्रीमंतांचे राहूल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : देशातील कष्टकरी समाज राब राबतोय, मात्र त्यांना सरकारकडून सन्मान मिळत नाही, मोदी सरकार केवळ मूठभर श्रीमंत असल्याची घणाघाती टीका काँगे्रसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी सोमवारी केली. ते राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ओबीसी महासंमेलनाला संबोधित करतांना बोलत होते. 
यावेळी बोलतांना गांधी म्हणाले की, मोदी सरकार देशातील सर्वात श्रीमंत 15 लोकांसाठी काम करत आहेत. मात्र या देशातील कष्टकरी समाजाला या सरकारने वार्‍यावर सोडले आहे. या कष्टकरी समाजाजवळ कौशल्य आहे, मात्र त्यांना संधी मिळत नाही. त्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ही गांधी यांनी यावेळी केला. भारतात ज्या लोकांकडे कौशल्य आहे, त्यांना बँका कधीही कर्ज देत नाहीत. कोकाकोला कंपनीचा मालक सुरुवातीला साधारण काम करीत होता. मॅकडॉनल्डवाला ढाबा चालवत होता. फोर्ड, मर्सडिज, होंडा कंपन्या सुरु करणारे मॅकेनिक होते. असे लोक भारतातही आहेत. मात्र, फोर्डसाठी बँकांनी मदत केली तशी आपल्याकडे केली जात नाही. ज्यांच्याजवळ कौशल्य आहे त्यांना देश काहाही देत नाही. काँग्रेसच्या काळात प्रत्येक जण मोकळेपणाने बोलू शकत होता. मात्र, आता लोक आपले म्हणणे मांडण्यापासून घाबरत आहेत. मात्र, आम्ही ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून देऊ, सत्तेच्या चाव्या तुमच्याकडे द्यायच्या आहेत. आपल्याला एकमेकांसोबत काम करायचे आहे, असे आवाहन यावेळी राहुल गांधी यांनी ओबीसी समुदयाला केले. ‘कोका कोला’ या आंतरराष्ट्रीय शीतपेयाचा निर्माता एकेकाळी सरबत विकत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. तर ’मॅकडोनल्डस’चा मालक रस्त्याच्या कडेला ढाबा चालवित असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते संमेलनालसाठी उपस्थित होते. यावेळी राहुल यांनी हा दावा केला आहे. भारतीय लोकांकडे कौशल्ये मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, त्याप्रमाणात त्यांना संधी उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा राहुल यांनी यावेळी उपस्थित केला. आपला मुद्दा उपस्थितांना पटवून देण्यासाठी राहुल यांनी कोका कोला आणि ’मॅकडोनल्ड्स’च्या मालकाचे उदाहरण दिले.

देशातील 15 श्रीमंताचे हे सरकार 
देशात कष्टकरी समाज मोठया प्रमाणात असून, त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या जात नाही. या कष्टकरी समाजाकडे मोठया प्रमाणात कौशल्य असूनही, त्यांना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. मोदी सरकारला या लोकांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, कारण मोदी सरकार हे केवळ मूठभर श्रीमंताचे सरकार असून, देशातील केवळ 15 श्रीमंतासाठी हे सरकार काम करीत असल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला.