Breaking News

दीड लाखांची बेकायदेशीर दारू पकडली

पोलीसांनी नान्नज जामखेड रोडवर केलेल्या नाकाबंदीत एका कारमधून दिड लाख रुपयांचा बेकायदेशीर देशी विदेशी दारू साठा पकडला असून, कारसह एका व्यक्तीला पोलीसांनी अटक केली आहे. यामुळे तालुक्यात अवैध दारू विक्री करणार्‍यांना चांगलाच धसका बसला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी नान्नज जामखेड रस्त्यावर नान्नज परीसरात नाकाबंदी केली. येथील शासकीय विश्रामगृहाजवळ संशयित म्हणून एका कारची तपासणी करूत आसताना एम.एच 16 ए.आर 491 क्रमांकाच्या कारमध्ये 1 लाख 50 हजार 48 रूपये किंमतीची बेकायदेशीर देशी विदेशी दारू आढळून आली. याप्रकरणी पो.कॉ. गहिनीनाथ यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी बबन सदाशिव लाडाने वय 52 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
1 लाख 50 हजार 48 रूपये किंमतीची बेकायदा देशी विदेशी दारू व दोन लाख रुपये किमतीची कार अशी एकुण माल 3 लाख 50 हजार 48 रूपये पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज साखरे, श्यामसुंदर जाधव, नवनाथ भिताडे, राहुल सपट, गहिनीनाथ यादव यांनी ही कारवाई केली आहे.