योगसाधनेच्या परंपरेला मिळाली अनोखी प्रेरणा, प्रवरा परिसरात योगदिन उत्साहात
प्रवरानगर प्रतिनिधी
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने जागतिक योगादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच नवचैत्यन्य निर्माण झाले. यामुळे प्रवरा परिसर योगमय झाला. या योगदिनामुळे प्रवरेच्या योगसाधनेच्या जुन्या परंपरेला अनोखी प्रेरणा मिळाली.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ४५ प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील सुमारे २४ हजार विद्यार्थी तसेच सहा कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान व संगणक महाविद्यालयातील साडेसहा हजार आणि दोन अभियांत्रिकी, पाच फार्मसी, दोन आर्किटेचर, कृषिसंलग्नीत तीन महाविद्यालये आणि पदविका शिक्षण घेणाऱ्या सहा ते सात हजार तरुण-तरुणींनी योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. शाळांचे मुख्याद्यापक महाविद्यालयांचे, प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका आणि क्रीडा शिक्षकांसह इतर कर्मचारी आणि ग्रामस्थसुद्धा यात सहभागी झाले होते.
प्रवरा पब्लिक स्कूलच्या अथेलेटिक्स मैदानावर प्रवरा पब्लिक स्कूल आणि प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्कूलचे प्राचार्य सयराम शेळके, प्राचार्या स्वाती लोखंडे ,के. टी. अडसुळ, जगधने, क्रीडा संचालक गोरक्ष दळे, राजेंद्र तांबे तर कन्या कॅम्पसमध्ये महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर, कन्याविद्या मंदिरच्या प्राचार्या लिलावती सरोदे, गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या संगिता देवकर क्रीडासंचालक डॉ. उत्तम अनाप, विद्या घोरपडे, राहुल काळे, तर पद्मशी विखे पाटील महाविद्यालयामध्ये डॉ. प्रदीप दिघे, उपप्राचार्य डॉ. रामचंद्र रसाळ, प्रा. दत्तात्रय थोरात, छाया गलांडे, क्रीडा संचालक अफजल पटेल आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर प्राचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य मनोज परजणे, क्रीडा संचालक दीपक देशमुख, कृषी संलग्नित महाविद्यालयांमध्ये कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर, कृषी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या अरुण थोरात, जनार्धन खरात, क्रीडा संचालक सीताराम वरखड आणि फार्मसी महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. हिरेमठ, डी. बी. थोरात, जयंत धर्माधिकारी आदींच्या मार्गदर्शनाखाली योगदिन साजरा करण्यात आला.