पाण्याचा वापर काटकसरीने करा
मान्सुनपूर्व काळात नगर शहरात पाणीपुवठा विद्युतपुरवठा खंडीत होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, सद्यस्थितीत मान्सुनपूर्व परिस्थिती असून लवकरच पावसाळ्याचे दिवस सुरु होत असल्याने आजवरचा अनुभव मान्सुनपूर्व काळात वादळी वार्यामुळे शहर पाणीपुवरठा योजनेकरीता विद्युत वितरण कंपनीकडून होणारा वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वीज मंडळाकडून होणारा वीज पुरवठा नैसर्गिक आपत्ती व तांत्रिक अडचणीमुळे बिघात निर्माण होवून वीजपुरवठा अर्धा-एक तास जरी खंडीत झाला तरी मुळानगर, विळद व नागापूर येथील कार्यरत पंपींग स्टेशन येथून पाणी उपसा सुरळीत होण्यास सुरवात दाने ते तीन तासाचा अवधी लागतो. त्यामुळे अनियमित पाणी उपसा होवून शहरातील तिवरणासाठीच्या टाक्या वेळेत भरता येत नाहीत. पर्यायाने शहरास नियमित व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पाण्याचा वापर जपुन करावा असे आवाहन करण्यात आले आहे.