Breaking News

रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये मंजूर


डोंबिवली - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ अंतर्गत कल्याण तालुक्यातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. सदर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर यश आले आहे. ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे दोन केाटी रुपये राज्य शासनाने मंजुर केले आहेत.
याबाबत स्थानिक आमदार सुभाष भेाईर दिलेल्या माहितीनुसार कल्याण तालुक्यातील वाकलण, पिंपरी गोसिया, वडवली, शिरढोण, दहिसर खेात बंगला, बाळे गणपती मंदिर, नारीवली गावतलाव, शिरढोण तलाव सुशोभिकरण आदी सुमारे बारा कामांसाठी शासनाकडे 2515 अंतर्गत निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सहा कामांसाठी सुमारे 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या ग्रामविकास कार्यक्रम निधी अंतर्गत यामध्ये वाकलण ते ठाकुरपाडा रस्ता, वाकलण भोईरपाडा रस्ता, वडवली अंतर्गत रस्ते, शिरढोण येथे गटारे पेव्हर ब्लॉक बसवणे, बाळे गणपती गाव तलाव सुशेाभिकरण अशा कामांना मंजूरी मिळाली असून सुमारे 2 कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. शासनाने खर्च मंजूर करताना ज्या कामांसाठी अनुदान मंजूर केले त्याच क ामावर खर्च करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कामासाठी ग्रामस्थ सतत पाठपुरावा करत होते. त्यामुळे या कामाला यश आले असून ग्रामीण भागातील रस्ते, तलाव आता दुरुस्त होतील असा विश्‍वास त्यानी व्यक्त केला. आमदार सुभाष भेाईर यांच्या प्रयत्नामुळे कामे होत असून ग्रामीण भागातील रस्त्यांची समस्या काही प्रमाणात सुटणार आहे.