Breaking News

डोंबिवलीत 8 रिक्षांच्या मॅकव्हीलसह टायर, 4 बॅटर्‍या चोरीला


डोंबिवली - ठाण्याच्या एकता क्रेडीट सोसायटीचे कर्ज थकविलेल्या 12 रिक्षा डोंबिवली पूर्वेतील सोनारपाडा येथील सदगुरू ऑटो डिलर्सच्या सुरेश पाटील कंपाउंड मध्ये उभ्या क रण्यात आल्या होत्या. त्यापैकी 8 रिक्षांचे मॅकव्हीलसह टायर आणि 4 बॅटर्‍या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी रमाशंकर दीक्षित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.