Breaking News

ससूनची बायोकेमिस्ट्री लॅब झाली सुसज्ज


पुणे, दि. 13, जून - ससूनची सेंट्रल क्लिनिकल बायोकेमिस्ट्री लॅब 24 तास, अहोरात्र रक्त चाचण्यांचे अहवाल देऊन फिजिशियन, सर्जनला निदानासाठी साह्यभूत आहे. हर्नियापासून ते न्यूरोसर्जरी, किडनी ट्रान्सप्लान्टपर्यंत शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर विविध रक्त चाचण्या केल्या जातात. सध्या फुल्ली ऑटोमेटेड रपरश्रूूशी वर ब्लड ग्लुकोज, सिरम युरिया, सिरम क्रिएटिनिन, सिरम बिलीरुबिन इ. रक्तचाचण्यांचे अहवाल प्राप्त होतात. गतवर्षी केमिलुमिनिसन्स अनालयाझेरची भर पडल्यामुळे ससूनची बायोकेमिस्ट्री लॅब सुसज्ज झाली आहे. सर्व रक्ताचाचण्या ससून मध्येच होतात. केमिलुमिनिसन्स अनालयाझेर वर थॉयराइड हार्मोन्स, इन्सुलिन, व्हिटॅमिन डी या रक्तचाचण्या होतात. तसेच वंध्यत्व तपासणीसाठी सिरम एफ. एस एच (फॉलिकल स्टिम्युलेटिंग ), सिरम एल एच (लुटीनझिंग हार्मोन) सिरम प्रोलॅक्टिन इ. महत्वाच्या चाचण्या गरजू रुग्णासाठी ससूनच्या बायोकेमिस्ट्री लॅबमध्ये होतात. एकूण 50 च्या वर रक्त चाचण्या उपलब्ध आहेत. 
2014 - 7,23,420
2015 - 7,59,321
2016 - 8,87,114
2017-11,40,526
एकूण रक्त चाचण्या याप्रमा. आर्टेरिअल ब्लड गॅस रपरश्रूूशी असून त्यावर झक,झज2,झउज2 याचे प्रमाण तपासले जाते. नवीनच इलेकट्रोफोरॉसिस मशीनवर नवीन रक्त तपासण्या करणे शक्य होणार आहे. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या दूरदृष्टीमुळे ससूनची बायोकेमिस्ट्री लॅब सुसज्ज झाली आहे. बाह्यरुग्ण तसेच आंतररुग्ण विभागातील रुग्णांसाठी लॅबची सुविधा उत्तम आहे. राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेची मानके लागू करून अचूक व तात्काळ अहवाल देण्याचा मनोदय आहे.