Breaking News

उक्कलगाव येथे शेतकरी मेळावा उत्साहात


उक्कलगाव प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटना व उक्कलगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी शिक्षण संस्था धनवाट रस्ता येथे शेतकरी मेळावा आणि आर.सी.एफ कंपनी किसान बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती आबासाहेब थोरात हे होते. या शेतकरी मेळाव्यास प्रमुख वक्ते दशरथ सांवत(अकोले), रावसाहेब पा.थोरात, डॉ. ढगे, मा. जि. अध्यक्ष आंबादास कोरडे, नाशिकचे हंसराज वडघूळे, मा.पुंजाबापू आहेर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे खा. राजु शेट्टी यांच्या सुचनेनुसार पुजांबापु आहेर यांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. शेतकरी मेळाव्यात शेतकरी विकास थोरात, सुनिल थोरात आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शेतकरी मेळाव्याचे प्रमुख वक्ते दशरथ सांवत म्हणाले की, आपल्या गावात आणि राज्यात बी. एस. सी. अॅग्री असणारे तरुण सुशिक्षित झाले आहे. पण सुशिक्षित असुण नोकरी नाही. नोकरी साठी संघर्ष करावा लागतो. आज वर आपल्या शेतमाला रास्त भाव दिला जात नाही. या सरकार आडमुठे धोरणामुळे आपली शेती धोक्यात आली आहे. यावेळी हंसराज वडघुळे,आंबादास कोरडे, डाॅ. ढगे.पा. आदी मान्यवरांनी तरुण शेतक-यांना व शेतीविषयक मार्गदर्शन केले. यावेळी संरपच नितीन थोरात, रविद्र थोरात, रविद्र जगधने, कारेगाव चे सुभाष पटारे, सचिन शेटे, बाळासाहेब वरखड, कुंडलिक भिगांरे, शेतकरी नामदेव काका मोरे, उल्हास महाराज तांबे, ईश्वर दंरदले, रावसाहेब थोरात, चेअरमन अॅड. राजाभाऊ थोरात, व्हा.शिवाजी थोरात, रामचंद्र थोरात, सुनिल पारखे, दिंगबर मोरे, राम नागरे, आर.सी.एफ. चे हरीश मोरे व प्रकाश थोरात, गौतम थोरात, केरु तोरणे, ज्ञानदेव थोरात, किशोर जगधने,रामा मोरे, सुभाष थोरात,तावरे मामा,रमेश थोरात,प्रकाश आण्णासाहेब थोरात, नवनाथ गडाख, हर्षद वाबळे , पञकार शरद थोरात, भाऊसाहेब मोरे, भरत थोरात आदी उपस्थित होते. प्रास्तविक प्रतापराव पटारे यांनी केले. तर मान्यवरांचे आभार तालुकाध्यक्ष सुभाष पटारे यांनी मानले. या शेतकरी मेळाव्यास पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.