Breaking News

उक्कलगाव येथे उपक्रमशील शिक्षकांचा गौरव



उक्कलगाव / प्रतिनिधी /  
उपक्रमशीलतेची जोड देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी मिर्झापूरची शाळा परिसराचे वैभव आहे. आणि आजचा हा निरोपाचा भव्य सोहळा म्हणजे येथील शिक्षकांच्या चांगल्या कामाची पावती आहे असे गौरवोदगार संगमनेर पंचायत समितीच्या सभापती निशाताई कोकणे यांनी काढले. मिर्झापूर येथील शिक्षकांच्या निरोप समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे जि.प.सदस्य रामहरी कातोरे तसेच संगमनेर कारखान्याचे संचालक बाळासाहेब मोरे , बाजार समितीचे संचालक मारुती कवडे, युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश नेहे , युवानेते दत्ताभाऊ कोकणे , सरपंच संगीताताई वलवे, उपसरपंच शंकर वलवे, ग्रामपंचायत सदस्य योगेश खताळ,जनसेवक मारुती कोल्हे, शा.व्य.समितीचे अध्यक्ष राजाराम वलवे आदी उपस्थित होते. यावेळी उपक्रमशील शिक्षक संतोष दिवे, मुख्या. अण्णासाहेब खतोडे, शोभा देशमुख, नलिनी साळवे, शांताबाई आंबरे,यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. जि. प.सदस्य रामहरी कातोरे यांनी मनोगतात शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी प्रयत्न करू असे जाहीर केले.संगमनेर कारखान्याचे संचालक बाळासाहेब मोरे यांनी मनोगतात या शाळेत विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचा चांगला समन्वय पाहायला मिळाला. यातूनच शाळेची गुणवत्ता वाढली असे नमूद केले. सत्काराला उत्तर देताना उपक्रमशील शिक्षक संतोष दिवे यांनी दहा वर्षाचा शैक्षणिक प्रवास उलगडला.शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या नात्यांचा ओलावा हाच शिक्षकाला कार्यप्रवण करतो.येथील कामामुळेच मला पाच राज्य पुरस्कार मिळाले. शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी या शाळेत नव्याने आलेले शिक्षक, मुख्या.भाऊसाहेब शेळके, भास्कर हासे ,सुशीला धुमाळ,संगीता घुले ,बाळू चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन वलवे, कचरू वलवे आदी ग्रामस्थांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हाडाचे निवृत्त अधिकारी सावळेराम घोडे होते. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वलवे यांनी केले तर आभार कैलास वलवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकर वलवे, राधाकिसन वलवे, गौतम निळे , अनिल वलवे, कारभारी वलवे, जयदीप वलवे, पोलीस पाटील चंद्रभान वलवे , रावसाहेब भालके आदींनी प्रयत्न केले.