ती आणीबाणी दोनच वर्षांची होती, पण गेली चार वर्षे आपण अघोषित आणीबाणी झेलतोय !
आणीबाणीवरुन सुरु झालेल्या राजकीय धुमश्चक्रीत आता मनसेनं उडी मारली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेली आणीबाणी ही दोन वर्षांची होती पण गेली चार वर्षे आपण अघोषित आणीबाणी झेलतोय' असं ट्विट करत भाजपवर टीका केलीयं.
भारतीय पक्षाचे नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आणीबाणीवर टीका करताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केली होती. त्याचंच समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी काही ट्विट केले होते. आज मोदी याच विषयावर मुंबईत भाषण करणार आहेत. आणि त्यावरूनच देशपांडे यांनी आता भाजपवर टीका केली आहे.